#जळगाव वनविभागात आपले स्वागत आहे.
जळगाव जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 11765 चौ.कि.मी. असून एकूण क्षेत्र 1808 चौ.कि.मी. असून त्यात राखीव वन 1796 चौ.कि.मी. व संरक्षित वन 12 चौ.कि.मी. आहे. त्यापैकी जळगाव वनविभागात 825.77 चौ.कि.मी. राखीव वन आहे. जिल्हयात एकूण 15 तालुके असून चोपडा, यावल ,रावेर हे तालुके यावल वनविभागात असून उर्वरीत जळगाव,एरंडोल,धरणगाव, पारोळा,अमळनेर, चाळीसगाव भडगाव, पाचोरा, जामनेर ,भुसावळ बोदवड व मुक्ताईनगर या 12 तालुक्यामध्ये जळगाव वनविभागाचे क्षेत्र विखुरलेले आहे. जळगाव वनविभागाची हद्द उत्तरेस तापी नदी, व यावल वनविभागाची हद्द आहे. वनविभागाच्या दक्षिणेस औरंगाबाद तथा जालना जिल्हयाची हद्द आहे पश्चिमेस धुळे व नाशिक जिल्हयाची हद्द असून पुर्वेस मध्यप्रदेशाची हद्द व बुलढाणा जिल्हयाची हद्द आहे. जिल्हयाचा भाग हा दख्खनच्या पठारात येतो. त्यात तापी नदीचे खोरे तथा सातमाळ (सातपुडा) आणि अजिंठयाच्या डोंगरांचा समावेश आहे. जळगांव वनविभागातील जळगांव वनक्षेत्र हे Southern Tropical Dry deciduous Forest या प्रकारचे आहे.

Hon. Chief Minister, Maharashtra State

Hon. Deputy Chief Minister, Maharashtra State

Hon. Deputy Chief Minister, Maharashtra State

Hon. Forest Minister, Maharashtra State

Hon. Principal Secretary, Forest Department Maharashtra State

Principal Chief Conservator of Forests (Head of Forest Force), Maharashtra State

Conservator of Forests,
Dhule Circle