Loading...
प्रशासकीय इमारत, टप्पा-३, तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव

गोद्री वनउद्यान

गोद्री वनउद्यान

सदर वनउद्यान डालकी धबधबा येथे विकसित करण्यात येत आहे. डालकी धबधबा अजिंठा डोंगररांगांतून कोसळताना बघणे विलोभनीय असते. सदर ठिकाणी जळगाव वन विभागाच्या माध्यमातून गोद्री वन उद्यान विकसित केले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी धबधब्यापर्यंत जाण्याचा रस्ता, पार्किंग, सेल्फी पॉइंट, वॉचटॉवर, मचाण इ. प्रकारच्या सोईसुविधा निर्माण करण्यात आले आहे. सदर वन उद्यान जामनेर पासून 35 km तर बुलढण्यापासून 65km अंतरावर आहे.

डालकीचा धबधबा

सदरील धबधबा हा गोद्री ता. जामनेर, जि. जळगाव येथील अजिंठा डोंगरात आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी आपणास जामनेर पासून 35 km तर बुलढाण्यापासून 65 km गोद्री-फत्तेपूर-धावडा मार्गे यावे लागेल. सदरील धबधब्याच्या ठिकाणी महाराष्ट्र वनविभागाने नुकतेच पर्यटन वियकसित केले आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीच्या दृष्टिकोनातून हे पर्यंटणाचे काम पूर्ण केले आहे. यात पर्यटकांची कोणत्याही प्रकारची गैर सोय होणार नाही याची काळजी घेत कार्य पूर्ण केले आहे.

ह्या धबधब्याचे प्रमुख वैशिष्टे म्हणजे पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद स्वच्छंदपणे घेता येईल, धबधब्यापर्यंत जाण्यास पायऱ्यांची सोय केली आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रेन पार्क, कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम्सची सोय, पार्किंगची उत्तम अशी व्यवस्था, ठिकठिकाणी विविध प्रकारचे सेल्फी पॉईंट्स असे अनेक प्रकारची वैशिष्टे आपणास याठिकाणी दिसतील.