Loading...
प्रशासकीय इमारत, टप्पा-३, तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव

लांडोरखोरी वनउद्यान

बोधचिन्ह आणि त्याची भूमिका

आम्हाला आपल्या लांडोरखोरी वन उद्यानाचे नवीन बोधचिन्ह आपणास सादर करण्यास आनंद होत आहे, ज्या बोध चिन्हामध्ये निसर्ग आणि आपले आरोग्यदायी जीवन ह्यातील चैतन्यमय मिलाप दर्शवला आहे. हिरव्यागार पानांमध्ये वसलेली एक सुंदर योग मुद्रा हे मानवी चैतन्यमय जीवन आणि निसर्ग यांच्यातील सखोल अनुभूतीचे प्रतीक आहे. योग मुद्रा आपल्या सर्वांगीण आरोग्य जोपासनेची वचनबद्धता दर्शवते तर झाडांची हिरवी पाने विकास, चैतन्य आणि निसर्गाची पुनरुज्जीवन क्षमता दर्शवितात.

बोधचिन्हाची रंगसंगती हिरव्या रंगाच्या छटा आणि केशरी रंग हे निसर्ग आणि आध्यात्मिक स्थिरचित्त शांतता दर्शवतात. लांडोरखोरी वन उद्यानाचे बोधचिन्ह हे केवळ विविध उपक्रमांद्वारे आरोग्यदायी जीवनाला चालना देण्याचे धोरण प्रस्थापित करत नाही तर आपल्या समाजासाठी आम्ही जोपासत असलेल्या शांत आणि प्रसन्न वातावरणाची ओळख करून देते. आपण सर्व मिळून निसर्गाच्या सानिध्यात आपले तन-मन चैतन्यमय करणाऱ्या आरोग्यदायी जीवसनशैलीचा स्वीकार करूया.

लांडोरखोरी वनउद्यान

जळगाव वन ववभाग अंतगगत जळगाव शहराच्या मध्यभागी वसलेले लांडोरखोरी वन उद्यान हे ननयत क्षेत्र मेहरून अंतगगत कक्ष क्रमांक 406 मध्ये असून त्याचे एकूण क्षेत्र 62.12 हेक्टर इतके आहे. लांडोर खोरी वन उद्यान हे जैवववववधता संपन्न क्षेत्र असून त्यास जैव ववववधता वारसा स्थळ म्हणून घोवित करण्यात आलेले आहे.

लांडोर खोरी वन उद्यानास सन 2023-24 या वर्षात साधारणपणे 70 हजार इतक्या पर्यटकांनी भेट दिलेली आहे. लांडोर खोरी येथे 200 इतके वार्षिक पास पर्यटकांना वाटप करण्यात आलेले होते. सदर कालावधीत साधारणपणे 50 शाळा व महाविद्यालय इ च्या विद्यार्थ्यांनी भेटी दिलेल्या आहेत.

लांडोर खोरी वन उद्यान येथे सन 2024 या वर्षात पर्यटकांच्या सोयी व विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून विविध कामे करण्यात आलेली असून वन उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत. लांडोर खोरी वन उद्यानामध्ये प्राधान्याने नक्षत्रवन, राशीवन, औषधी वनस्पती वन, गुलाब वन असे अनेक विविध वनांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांसाठी तलावाचे सौंदर्यीकरण, खुली व्यायाम शाळा, लहान मुलांची खेळणी, लॉन तयार करणे, पर्यटकांसाठी स्वच्छतागहृ, आकर्षक कमान,पॅगोडा,कृत्रिम धबधबा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वन सभागहृची निर्मिती इ सोयी सुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच विविध वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती लावण्यात आले असून विविध वन्यप्राणी व वनस्पतींबाबत माहिती देणारे माहिती फलक लावण्यात आलेले आहेत.

वर नमूद केलेल्या विकासात्मक कामांमुळे लांडोर खोरी वन उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली असून सन 2024-25 या वर्षात साधारणपणे 1.5 लाख इतक्या पर्यटकांनी भेट दिलेली आहे. लांडोर खोरी येथे सरासरी 25 इतके मासिक पास व 250 इतके वार्षिक पास पर्यटकांना वाटप करण्यात आलेले आहेत. त्यातून 28,43,370 रु. एवढा महसूल प्राप्त झालेला आहे. सदर ठिकाणी पर्यटकांसमवेत परिसरातील एकूण 119 विविध शाळा व महाविद्यालय यांच्या सहली देखील उद्यानास भेट देण्याकरिता आयोजित करण्यात आल्या होत्या. लांडोरखोरी वन उद्यानास भेट देण्याकरिता इतर जिल्हे व शहरांमधनू पर्यटक येतात व तेथील निसर्गाचा व सुविधांचा लाभ घेतात.